‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्याने केला राज्यात विक्रमी
1 min read
बीड दि.२२:-‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्याने राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (#पीएमएवाय) तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली असून,
या निमित्तानं बीडकरांचे हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न साकार झाले आहे. या कामासाठी सरकारमार्फत ९९० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे बीड जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत नवा विक्रम रचला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
