निमगाव सावा येथे तरुणांतर्फे जनजागृती मोहीम वनविभागास मदत
1 min read
निमगाव सावा दि.२०:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. बिबट मानव संघर्ष टाळण्यासाठी तसेच हल्ल्याची घटना घडू नये म्हणून येथील ग्रामस्थांनीच बिबट्याविषयी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सामाजिक बांधिलकी समजून या ग्रामस्थांकडून वनविभागाच्या कामात हातभार लावला जात आहे.
बिबट्यांकडून पशुधनावरील हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी येथे एक बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याकडून कोणावरही हल्ला होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे,
बिबट्यापासून स्वतःचे व घरातील लहान मुलांचे संरक्षण व्हावे, यासाठी निमगाव सावा गावातील सेवाभावी वृत्ती असलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण गोत्राळ, होमगार्ड गणेश गाडगे यांच्या संकल्पनेतून ही बिबट जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
गावातील वाड्या वस्तीवर जाऊन नागरिक व महिलांना बिबट्याबाबत जनजागृती करण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांना नेकबेल्ट (मानेला लावण्याचा काटेरी पट्टा), झटका मशिन, पिंजरा आदी सुविधा पुरवण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून सहकार्य मिळत आहे.
जागृतीमुळे नागरिकांना आधार निमगावातील ग्रामस्थ चंद्रकांत जावळे (गुरुजी),वि वि कार्यकारी सो संचालक बबन घोडे, माऊली काटे, श्रीरंग गाडगे, अजित गाडगे, निलेश बेहेडे, सुनिल गहिणे, निलेश गाडगे, निखिल बेहेडे यांनी लोकांमध्ये मागील काही वर्षांमध्ये जुन्नर तालुक्यात बिबट्यांची समस्या मोठ्या स्वरूपात वाढली आहे.
या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण ग्रामस्थांच्या मदतीसाठी दिवस-रात्र उपलब्ध आहोत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आम्ही बिबट्याबाबत जनजागृती करत आहोत. जनजागृती करत बिबट्याचा या गंभीर संकटात स्वतःची काळजी कशी घ्यावी.याबाबत जनजागृती करून नागरिकांना आधार देत आहेत.
या जनजागृती मोहिमेसाठी विजय गणपत गाडगे,निलेश गाडगे यांनी वाहन सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. वाड्या वस्त्यांवर जाऊन वनविभागाने तयार केलेली बिबट्या संदर्भात ध्वनीफीत घ्नीक्षेपकावरून वाजवली जाते.
