जाधववाडी येथील विद्यार्थ्यांना शालापयोगी वस्तुंचे वाटप
1 min read
बोरी दि.२०:- जाधववाडी (बोरी बु.) ता.जुन्नर येथील श्री जगदंबा माध्यमिक विद्यालयातील १३२ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर (स्कूल बॅग) व जेवणाचा डबा (टिफिन बॉक्स) या शालापयोगी वस्तूंचे वितरण पुणे येथील डिसेंट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ नांदेड सिटी यांचे वतीने नुकतेच करण्यात आले.
डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना शालापयोगी वस्तूंचे वाटप, महिलांना मोफत शिवणकाम प्रशिक्षण, मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मेवाटप, स्रीयांमधील गर्भाशय व स्तनांचे कर्करोग निदान, अपंग व्यक्तींना इ-सायकल वाटप,
यांसारखे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळातही विद्यालयातील भौतिक सुविधांसाठी सहकार्य करणार असल्याचे डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कसाळ यांनी डिसेंट फाउंडेशनमार्फत दिलेल्या
शालापयोगी वस्तु ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व प्रेरणादायी असल्याचे सांगितले तसेच विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांमार्फत शालेय परिसरात उपलब्ध करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कलामंच, संगणक कक्ष यांसारख्या भौतिक सुविधा विद्यालयाच्या आगामी वाटचालीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते रो.रोहित नरवडे, जाधववाडीचे सरपंच अजित जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशन,संस्थेचे सचिव डॉ.एफ.बी.आतार,संचालक आदिनाथ चव्हाण,संभाजी काळे, रोटरी क्लब ऑफ नांदेड सिटीचे अध्यक्ष कुशल कारेवार, महावितरणचे व्यवस्थापक पांडुरंग तोडकर, व्यवस्थापक संतोष कोरडे (महानिर्मिती),
सामाजिक कार्यकर्ते रोहित नरवडे, सारंग शिंदे, सरपंच अजित जाधव,उपसरपंच दत्ता शेटे, डॉ.सिद्धी वायकर, संभाजी शेटे, तान्हाजी जाधव तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश उनवणे यांनी केले व संतोष गाडगे यांनी आभार मानले.
