दिवाळीला मागणी वाढल्याने झाडणीची किंमत वाढली

1 min read

बेल्हे दि.१९:- बेल्हे (ता. जुन्नर) येथील सोमवारी आठवडे बाजारात दिवाळीसाठी लागणारी झाडणी (लक्ष्मी) सध्याच्या दरात व दोन वर्षापूर्वीच्या दरात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. दिवाळीनिमित्त प्रत्येक घरात पूजन करण्यासाठी झाडणी लक्ष्मी घेतली जाते. दोन वर्षापासून झाडणीच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये हे झाडू बनवण्यासाठी लागणारे शिंदडीच्या झुडुपांचे प्रमाण कमी असल्याने मध्य प्रदेशातील इंदोर येथून सर्व माला व्यापारी आयात करतात. त्यामुळे हे दरवाढ झाली असल्याची माहिती साकुर मांडवे येथील व्यापारी गोरक्ष बंडलवाल यांनी दिली.

——
चौकट
झाडू प्रकार,दोन वर्षापूर्वीचा दर व सध्याचा दर १) सर्वात लहान झाडू पूर्वीचा दर १० ते १५, सध्याचा दर १८ ते २०
२)मध्यम झाडू पूर्वीचा दर ३५ ते ४०,सध्याचा दर ५५ ते ६० ३) मोठा झाडू पूर्वीचा दर ७० ते ८०, सध्याचा दर ९५ ते १०० ४) लांब दांड्याचा झाडू पूर्वीचा दर ४० ते ५०, सध्याचा दर ७० ते ८०

———–
चौकट

‘ दिवाळीत झाडूचे महत्त्व हे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीशी जोडलेले आहे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, कारण ते घरातून नकारात्मक ऊर्जा आणि अस्वच्छता दूर करते, ज्यामुळे देवी लक्ष्मीचे स्वागत होते. दिवाळीच्या वेळी नवीन झाडू विकत घेणे किंवा लक्ष्मीपूजन करताना झाडूची पूजा करणे हे आर्थिक समृद्धी, यश आणि घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते’.
———

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!