बेल्हे – राजुरी गटात चुरशीची लढाई होणार
1 min read
बेल्हे दि.१९:- बेल्हे – राजुरी गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जिल्हा परिषदेसाठी आरक्षित असून पंचायत समितीला बेल्हे गणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष तर राजुरी गणामध्ये सर्वसाधारणासाठी आरक्षित आहे.
या बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. या गटात चुरशीची निवडणूक होणार आहे.
बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वल्लभ शेळके राष्ट्रवादी कडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना कामाचा अनुभव असून त्यांच्या कार्यकाळात या गटात त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत. त्यांचे पती वल्लभ शेळके यांचा गटात दांडगा जनसंपर्क आहे.
तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांचे निकटवर्तीय पंकज कणसे यांच्या पत्नी स्मिता पंकज कणसे या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू असून आमदार सोनवणे यांच्या मदतीने मागच्या काही महिन्यांपासून गावोगावी विकास कामांचा धडाका पंकज कणसे यांनी सुरू केला आहे.
तर माजी पंचायत समिती सदस्या वर्षा प्रदीप पिंगट या इच्छुक आहेत. त्या बेनके कुटुंबीयांशी एकनिष्ठ आहेत. भाजपाकडून राजुरीच्या शांता संजय गवळी ह्या इच्छुक आहेत.बेल्हे गणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व राजुरी गण हा सर्वसाधारण गटासाठी खुला आहे.
पंचायत समिती गणामध्ये आणे गावच्या सरपंच प्रियांका दाते यांचे पती व आमदार अतुल बेनके यांचे निकटवर्तीय प्रशांत दाते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तसेच शिंदेवाडी गावचे माजी सरपंच अजित शिंदे, गुळुंचवाडी गावचे सरपंच अतुल भांबेरे इच्छुक आहेत.
तर शिवसेनेचे शांताराम दाते व भाजपाचे अमोल शिंदे हे इच्छुक आहेत. पक्षाच्या तिकिटासाठी कोणाची वर्णी लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.पक्ष तिकीट मिळवण्यासाठी ऐनवेळी पक्ष प्रवेश होण्याची शक्यता दिसून येत आहे.असून मागील वेळी या गटामधून पांडुरंग पवार विजय झाले होते.
सध्या या गटामधून अनेक जण इच्छुक आहेत जुन्नर तालुक्यामध्ये या गटातील निवडणूक चांगली चुरशीची होणार आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी या गटासाठी भरीव योगदान दिलं आहे. कोट्यावधी रुपयांची विकास कामे या गटामध्ये पांडुरंग पवार यांच्या माध्यमातून झाली आहेत.
——–
चौकट
राजुरी- बेल्हे या गटामध्ये राजुरी, उंचखडक, गुळुंचवाडी, नळवणे, आणे, पेमदारा, शिंदेवाडी, बेल्हे, गुंजाळवाडी, बांगरवाडी, तांबेवाडी, रानमळा, साकोरी तर्फे बेल्हे, मंगरूळ व झाप या गावांचा समावेश आहे.
——–
गटातील समस्या
या गटात बिबट्यांची मोठी समस्या आहे. दुष्काळ ग्रस्त आणे पठारावर पाण्यासाठी पाठपुरावा करणे. शेतीमालाला बाजार भाव, रस्ते, आरोग्याच्या समस्या या गटामध्ये आहेत.
