आष्टीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

1 min read

बीड दि.१४ – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बावी-दरेवाडी गावात दुर्दैवी घटना घडली असून गुरांना चारण्यासाठी घेऊन गेलेल्या राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (३६) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.गोल्हार हे सकाळी शेतात गुरे चारण्यासाठी गेले होते आणि घरी परतले नाहीत. बिबट्याच्या हल्ल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी वन विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. गोल्हर यांचा अर्धा खाल्लेला मृतदेह शेतात आढळला, ज्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात आले, असे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमोल मुंडे म्हणाले. पोलिस आणि वन अधिकाऱ्यांनी रहिवाशांना अंधार पडल्यानंतर एकटे बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. आजूबाजूच्या सुमारे १५ गावांमध्ये गस्त आणि जागरूकता मोहीम वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!