अहिल्यानगर जिल्ह्यातील ६९ पोलीस अंमलदाराच्या विनंती बदल्या

1 min read

अहिल्यानगर दि.१४:-जिल्हा पोलीस दलातील ६९ पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहे. तर ९३ अंमलदारांची बदली अमान्य करण्यात आली आहे. १६२ अंमलदारांचे विनंती बदलीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार त्यांनी बदलीबाबत सोमवारी (ता.१३) आदेश काढले आहे.अधीक्षक घार्गे यांनी मे महिन्यात पदभार घेतल्यानंतर जून महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. यामधील काही अंमलदारांना बदल्याबाबत आक्षेप होता. त्यांनी आपली बदली इतर ठिकाणी करावी यासाठी विनंती अर्ज केला होता. तसेच काही अंमलदारांना पोलीस ठाणे/शाखेत पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विनंती बदली करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी विनंती अर्ज करणाऱ्या १६२ अंमलदारांची अडचण प्रत्यक्ष जाणून घेतली. त्यापैकी ६९ अंमलदारांचे अर्ज मान्य करत त्यांची विनंती बदली केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!