अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

1 min read

अहिल्यानगर दि.१४:- शहरातील कल्याण रस्ता परिसरात एकाने अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेले आणि तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही, तर हे घरी सांगितल्यास तुला येथेच सोडून देईन आणि जीवे ठार मारीन, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात हनुमंत दत्तात्रय पाटोळे (रा. कल्याण रस्ता, हल्ली रा. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाटोळे याने पीडित मुलीला दुचाकीवर बसवून कल्याण रस्त्यावरील एका निर्जनस्थळी नेले. दुचाकीवर जात असताना व तिथे गेल्यानंतर त्याने मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. घरी परतत असताना त्याने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!