पैसे नको, आमचं बाळ परत द्या; बिबट्याच्या हल्ल्यातील शिवन्याच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत
1 min read
पिंपरखेड दि. १३ (वार्ताहर) -पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्याच्या कुटुंबाला वनविभागाकडून तत्काळ दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी हा धनादेश शिवन्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केला. यावेळी ‘साहेब, पैसे नको आम्हाला या पैशाचं काय करू, आमचं बाळ आम्हाला परत द्या,’ म्हणत शिवन्याच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित अधिकाऱ्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.पिंपरखेड येथील घटनास्थळी जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी भेट देऊन
पिंपरखेड शिवन्याच्या आई व वडिलांकडे धनादेश सुपूर्द करताना केला.नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी बिबटमुक्त परिसरासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असता, ग्रामपंचायतीचे ठराव वरिष्ठ स्तरावर देऊन त्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन उपवनसंरक्षकांनी दिले.
घटनास्थळी एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी, जोपर्यंत हा परिसर बिबटमुक्त होत नाही आणि लोकांना शांततेत राहता येत नाही, तोपर्यंत बिबट्यांना जेरबंद करण्याची कारवाई अशीच सुरू राहील, असे निर्देश जुन्नरचे उपवनसंरक्षक खाडे यांनी वाईल्ड लाईफ व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिले.