शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर
1 min read
शिरुर दि.१३:- शिरुर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आज दि १३ ऑक्टोबर २०२५ आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने ही सोडत घेण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी नागरिक व इच्छुक प्रतिनिधींची उपस्थिती अत्यल्प होती.ज्यामुळे या सोडतीबाबत “उदासीनतेचे” वातावरण पाहायला मिळाले.या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिरुर तालुक्यातील स्वयंप्रकाश फरगडे या शाळकरी मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पारदर्शक आणि शांत वातावरणात सोडत प्रक्रिया पूर्ण झाली.
या सोडतीनुसार २०२५ च्या नव्या लोकसंख्या गणनेनुसार तालुक्यातील अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गाचे प्रमाण विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक वडगाव रासाई गणात असल्याने त्या गणाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले आहे.
तर, तालुक्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण कमी असल्याने या वेळी अनुसूचित जमातीसाठी कोणतेही आरक्षण निघालेले नाही. ओबीसी प्रवर्गासाठी एकूण तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी दोन जागा ओबीसी महिलांसाठी व एक जागा ओबीसी सर्वसाधारणसाठी राखण्यात आली आहे.
उरलेल्या दहा गणांमधून पाच गण सर्वसाधारण महिलांसाठी आणि पाच गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत.पुणे परिषद गटनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे न्हावरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित गट)
मांडवगण फराटा (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षित गट)तळेगाव ढमढेरे, शिक्रापुर, रांजणगाव गणपती (सर्वसाधारण प्रवर्ग, महिला आरक्षित गट) कवठे येमाई, पाबळ (सर्वसाधारण)
पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे
१) वडगाव रासाई (अनुसूचित जाती)
२) मांडवगण फराटा (ओबीसी महिला)
३) शिरूर ग्रामीण (ओबीसी महिला)
४) न्हावरे (सर्वसाधारण)
५) पाबळ (ओबीसी सर्वसाधारण)
६) केंदूर (सर्वसाधारण महिला)
७) कवठे यमाई (सर्वसाधारण महिला)८) टाकळी हाजी (ओबीसी महिला)
९) तळेगाव ढमढेरे (सर्वसाधारण महिला)
१०) रांजणगाव सांडस (सर्वसाधारण)
११) शिक्रापुर (सर्वसाधारण)
१२) सणसवाडी (सर्वसाधारण महिला)
१३) रांजणगाव गणपती (सर्वसाधारण)
१४) कारेगाव (सर्वसाधारण)या सोडतीच्या निमित्ताने आरक्षणाची प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पडल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले, मात्र इच्छुक उमेदवार व सामान्य नागरिकांनी घेतलेली ‘उदासीन भूमिका’ लक्षवेधी ठरली. पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सोडत आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम करेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.