बेल्हे प्राथमिक केंद्रांतर्गत ९५ टक्के पोलिओ लसीकरण
1 min read
बेल्हे दि.१३:- बेल्हे (ता.जुन्नर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रविवार दि.१२ रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. एकूण ३१ बुथ वर १९४१ पाच वर्षाच्या आतील बाळांना पोलिओ चा डोस पाजण्यात आला. एकूण ९५ टक्के लसीकरण पहिल्याच दिवशी पूर्ण झाले.
या पल्स पोलिओ कार्यक्रम पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड, वैद्यकीय अधिकारी डॉ. असीम अत्तार,आरोग्य निरीक्षक डॉ. अजय बांगर, राजेंद्र पवार, नरेंद्र देठे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी आरोग्य सेवक सेविका मदतनीस आशा अंगणवाडी सेविका
अंगणवाडी मदतनीस यांनी पल्स पोलिओ चे काम पाहिले. सामाजिक कार्यकर्ते जानकु डावखर तसेच गावच्या सरपंच मनीषा डावखर यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.
