आळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९३ टक्के लसीकरण
1 min read
आळे दि.१३:- आळे (ता.जुन्नर) प्राथमिक आरोग्य केंद्रात ९३ टक्के पोलिओ लसीकरण पूर्ण झाले.रविवार दि.१२ रोजी एकूण २ हजार २८९ बालकांना लसीकरण करण्यात आले. आळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आळे, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद येथे एकूण २६ पोलिओ बूथ लावण्यात आले होते.
अशी माहिती प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विशाल राठोड यांनी दिली. त्यांच्या समवेत आरोग्य सहायक रोहिदास मुंजाळ, तालुका विस्तार अधिकारी लक्ष्मी कोकणे, स्टाफ नर्स शालिनी ऑटी, ज्योती झटाले, लॅब टेक्निशियन सुनंदा साबळे, परिचर ज्ञानदा तळपे यांनी काम पाहिले. उरलेल्या बालकांचे लसीकरण गृह भेटी घेऊन पुढच्या तीन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.
