पुढच्या वर्षी देखील महापूर, अतिवृष्टीचे संकेत; मिरीच्या होईकातील भविष्यवाणी
1 min read
अहिल्यानगर दि.१०:- पुढच्या वर्षी देखील अतिवृष्टीसह महापुराचा सामना करावा लागणार, गहू, हरभरा उशिराने पिकणार, सोन्याला मोठा भाव मिळेल, कोणी हसेल तर कोणी रडेल अशा शब्दात मिरी येथील राजा वीरभद्र यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सिताराम भगत यांनी अंगावर तलवारीचे चावीस वार घेत पुढील वर्षाची भविष्यवाणी व्यक्त केली.
ग्रामदैवत राजा वीरभद्र देवस्थानच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सिताराम भगत यांची वर्षभराची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील हजारो भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते अक्षय कर्डिले यांनी देखील यात्रा उत्सवाला भेट देऊन राजा वीरभद्र देवस्थानचे दर्शन घेतले.
सिताराम भगत यांची भविष्यवाणी झाल्यानंतर भाविकांना राहुल बजरंग सोलाट, रतिलालजी लोढा यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कीर्तन सेवा झाली.
