नळवने येथे बंद घर फोडणारे चोरटे गजाआड; आळेफाटा पोलिसांची कामगिरी
1 min read
आळेफाटा दि.१०:- घरफोडी करणाऱ्या अट्टल परजिल्ह्यातील टोळीस आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केले. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नळवणे (ता.जुन्नर) गावचे हद्दीत रहात असलेले.
बबन दामोदर देशमुख हे कामा निमित्ताने मुंबई या ठिकाणी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कापून घरात प्रवेश करून सुमारे ६० हजार रूपये किंमतीचे चांदीच्या वस्तु तसेच घडयाळे चोरून नेल्यानंतर त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली होती.
आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या घरफोडीच्या वाढत्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळवली की, सदर गुन्हयातील संशयीत आरोपी विजय भगवान गोडे रा.तिरडे ता.अकोले जि.अहिल्यानगर याने केला.
असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने आरोपीस अकोले जि. अहिल्यानगर परिसरातून ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हा हा गोरक्षनाथ पंढरीनाथ खोकले रा. पाचपट्टावाडी ता. अकोले जि.अहिल्यानगर, बहिरू भिमा जाधव रा. कोकणवाडी ता.अकोले जि.अहिल्यानगर यांच्या मदतीने केला.
असल्याची कबुली दिल्याने या सर्वांना ताब्यात घेवून चोरलेला मुद्देमाल हा विजय गोडे याच्या घरी लपवून ठेवलेलेली चांदीची भांडी, चांदीचे पायातील जोडवी, चांदीचे गणपती पेंडल, हातातील मनगटी घडयाळे असा ४४ हजार रूपये किंमतीचा चांदीचा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर प्लस मोटार सायकल असा एकुण १ लाख १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पो.हवा निलेश खैरे, विनोद गायकवाड, पकंज पारखे, अमित मालुंजे, पो.कॉ नविन अरगडे, निखील मोरमोरे, विशाल पालवे यांनी केली आहे.
