नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन सोहळा संपन्न

1 min read

मुंबई दि.९:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि.८ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी विमानतळासह कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मार्ग, कफ परेड, गिरगाव, काळबादेवी मेट्रो, वन मुंबई – वन ॲप संकल्पनेतून ‘मुंबई वन’ ॲप, अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम आदी विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा पार पडला.याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, खासदार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!