MPSC कडून ‘गट क’ सेवेची 938 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
1 min read
पुणे दि.९:- एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक,
कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या भरतीसाठी ही परीक्षा आयोजित केली आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात 7 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता होईल. अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक 27 ऑक्टोबर रात्री 11.29 वाजेपर्यंत असेल.
खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये.● माजी सैनिकांसाठी 44 रुपये शुल्क असेल.● मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये खुल्या प्रवर्गासाठी, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 344 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये परीक्षा शुल्क असेल.● ऑनलाईन शुल्क 27 ऑक्टोबर रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारलं जाणार आहे.
