पंचायत समिती सभापती पदाकरिता आज आरक्षण सोडत
1 min read
पुणे दि.८: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत आज ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे, अशी माहितीजिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.
