बेल्हेश्वर चे माजी विद्यार्थी ३८ वर्षांनी एकत्र

1 min read

आणे दि.८:- रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेल्हे (ता. जुन्नर) येथील इयत्ता दहावीच्या सन १९८७- ८८ विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. नुकतेच साईकृपा हॉल बेल्हे येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३८ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आल्याने

व त्यांचा हा पहिलाच स्नेह मेळावा असल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.या स्नेह संमेलनाचे अध्यक्षपद शाळेचे माजी आदर्श शिक्षक बी. एल.पिंगट व संजय तांबे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रस्तावना जालिंदर औटी व रामदास डोंगरे यांनी केली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाकड पोलिस स्टेशनचे PSI किसन शिंदे , जलसंपदा विभागाचे अभियंता अतुल पिंगट, माजी सैनिक डी. डी.गुंजाळ, बेल्हे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किसन गुंजाळ, साईकृपा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे, संदीप गुंजाळ, मुंबई पोलिस मध्ये कार्यरत असलेले शरद दिघे, उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत केले.यावेळी बी. एल.पिंगट यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या विकास आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुणे किसन शिंदे यांनी शाळेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. अतुल पिंगट यांनी शाळेच्या मूलभूत गरजा आणि आवश्यकता याबद्दल माहिती दिली. किसन गुंजाळ यांनी शाळेच्या विकासाठी सर्वजण एकत्र येत भविष्यात शाळेच्या मूलभूत सुविधांवर प्रयत्न करत त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत असे नमूद केले.

यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी किसन शिंदे, अतुल पिंगट, संजय गावडे, गोविंद बांगर, सुलक्षण तपस्वी, संजय शिंदे, मनोज माने, नारायण बांगर,

राजेश शिरसाठ यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या विकासावर आणि सध्याच्या बदलत्या गरजांवर दृष्टिक्षेप टाकत शाळेस भरीव मदत करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद बांगर यांनी केले. कार्यक्रमाचे समारोपण धनंजय दंडवते आणि तानाजी कणसे यांनी पार पाडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!