अल्पवयीन मुलावर टोळक्याचा हल्ला
1 min read
अहिल्यानगर दि.८:- घोड्याच्या टांगा शर्यतीदरम्यान झालेल्या वादातून अल्पवयीन मुलावर (वय १७) पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नेप्ती (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका लॉन जवळ घडली. जखमी मुलगा मार्केटयार्ड, भवानीनगर येथील रहिवासी असून. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश महिंद्र बोरूडे, गौरव बोरूडे, गोरख बोरूडे व संकेत बोरूडे (सर्व रा. बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोड्याची टांगा शर्यतीची ट्रायल सुरू असताना पडापड झाली.
त्यावेळी फिर्यादी दुचाकीवर असताना संशयित आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करत मारहाण केली. या झटापटीत ९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तुटून गायब झाली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.