‘अयोध्यम’ मध्ये बुक करा ११ हजारात घर; १० दिवस खास ऑफर; अभिनेत्री श्रेया बुगडे च्या हस्ते लॉन्चिंग

1 min read

आळेफाटा दि.८:- एस. आर.पी डेव्हलपर्स निर्मित अयोध्यम वन 1 बीएचके, 2 बीएचके तसेच रो हाऊसचा लॉन्चिंग समारंभ आळेफाटा येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे ची विशेष उपस्थिती लाभली. अयोध्यमला आळेफाटा येथे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून लॉन्चिंगच्या दिवसापर्यंत ८० टक्के फ्लॅटचे बुकिंग पूर्ण झाले. २० टक्के फ्लॅट व रो हाऊस शिल्लक असून ग्राहकांना बुकिंग साठी दहा दिवस ऑफर कालावधी देण्यात आला आहे.ग्राहकांना फक्त ११ हजार रुपये बुकिंग अमाऊंट भरून फ्लॅट बुक करता येणार आहे. या वेळी हभप तुळशीराम महाराज सरकटे, समाजसेवक नेताजी डोके,पर्यावरण प्रेमी रमेश खरमाळे, मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष अरुण अवारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू हरिभाऊ थोरात, प्रोफेशनल बॉडी बिल्डर सिद्धेश गडगे, उद्योजक मुकुंद आवटी, प्रगतशील शेतकरी समीर वेठेकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्विमिंग पूल, मेडिटेशन स्पेस, क्लब हाऊस, जिम, वॉकिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, रो हाऊस व फ्लॅटचे उद्घाटन संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांचे आभार एस आरपी डेव्हलपर्स च्या वतीने विलास डावखर,जयराम गागरे, प्रशांत थोरात यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!