जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा उत्साहात
1 min read
जुन्नर दि.८:- जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, सहाय्यक निबंधक जुन्नर डॉ. गजेंद्र देशमुख उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थान फेडरेशनचे अध्यक्ष अमीत बेनके हे होते. यावेळी फेडरेशन संस्थापक कार्याध्यक्ष महादेव वाघ, उपाध्यक्ष गुलाब नेहरकर, सचिव भास्कर बांगर, खजिनदार सावकार पिंगट, संचालक संतोष तांबे, शैलेश गायकवाड, प्रविण डेरे, दिनकर राईंज, संजय गुंजाळ, संदीप औटी, विवेक कडलक, सुजाता काळे, चंदा गाडगे, गणेश वाजगे, निलेश लामखडे आदी उपस्थित होते.
अहवाल वाचन भास्कर बांगर यांनी केले.अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी पतसंस्था कायदा व नियमावली तसेच कर्ज वितरण व वसुली याविषयी विशेष मार्गदर्शन केले.सहकार क्षेत्रात काम करत असताना प्रत्यक्ष येणाऱ्या समस्या सोडवणे वसुली व्यवस्थापन करणे
या माध्यमातून फेडरेशन तालुक्यातील सहकारी पतसंस्था यांना सेवा देण्याचे कार्य करत आहे, असे अध्यक्ष अमीत बेनके यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. औटी व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. मुळे यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष गुलाब नेहरकर यांनी केले.
यावेळी जुन्नर तालुक्यातील २५ पतसंस्था यांना अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर व सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांचे व फेडरेशन पदाधिकारी यांच्या हस्ते जुन्नर सहकारभूषणने सन्मानित करण्यात आले.