श्री विघ्नहर करखान्याकडून शेतकरी व सभासदांना दिवाळीसाठी सवलतीच्या दरात साखर
1 min read
जुन्नर दि.८:- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद यांच्यासाठी दीपावलीनिमित्त सवलतीच्या दरातील साखरेचे वाटप ओतूर गट ऑफिसमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाले आहे. या दिवाळी भेटीमुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे व बाळासाहेब घुले यांनी ही माहिती दिली असून, त्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी आणिसभासदांना त्यांच्या हक्काची सवलतीच्या दरातील साखर त्वरित गट कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.
कारखान्याकडे ऊस पुरवठा केलेल्या शेतकरी आणि कारखान्याचे सभासद यांना ही सवलतीच्या दरातील साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ओतूर येथील गट ऑफिसमध्ये हे वाटप ६ ते १६ ऑक्टोबरपर्यंत ओतूर गट ऑफिस येथे सुरू राहणार आहे. दरम्यान या साखरेच्या वाटपाच्या
शुभारंभावेळी ग्रामविकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, नीलम तांबे, बाळासाहेब घुले, बाजार समितीचे संचालक तुषार थोरात, भाजप नेते भगवान घोलप, ओतूर तंटामुक्ती अध्यक्ष अनुराग फापाळे,विघ्नहरचे माजी संचालक आत्माराम गाढवे, रंगनाथ घोलप,
ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे, जेष्ठ नेते विठ्ठल डुंबरे, शांताराम तांबे, दत्ता गीते, विक्रम अवचट, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, दत्तात्रय डुंबरे, जनार्दन खामकर, रामदास तांबे आदी उपस्थित होते.संचालक धनंजय डुंबरे म्हणाले, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी ओतूर गट ऑफिस मधून साखर घेऊन जावी.
कारखान्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या गोडव्यामध्ये भर टाकण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे मत चेअरमन सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केले.