श्री साईगणेश , सभासदांना १० टक्के लाभांश व २ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण
1 min read
आणे दि.७:- श्री साईगणेश कृपा पतसंस्था मंगरुळ (ता.जुन्नर) संस्थेच्या वतीने जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन नवनिर्वाचित पदाधिकारी अमित बेनके अध्यक्ष, उपाध्यक्ष गुलाब नेहरकर, सचिव भास्कर बांगर, खजिनदार सावकार पिंगट, चंदा गाडगे संचालिका, तज्ञ संचालक निलेश लामखडे, सल्लागार प्रकाश चव्हाण,
विजय गाडगे यांचा संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. श्री साईगणेश कृपा पतसंस्थांच्या ठेवी १० कोटी ३५ लाख ३८ हजार असून ७ कोटी १३ लाख रुपयांचे कर्जवाटप संस्थेने केले आहे. ११ लाख ९२ हजार त्यांचा संस्थेला नफा झाला आहे.
संस्था ऑडिट वर्ग ‘अ’ असून सभासदांना दिपावली भेट वस्तू , १० टक्के लाभांश, दिपावली भेट वस्तू वाटप तसेच २ लाख अपघाती विमा संरक्षण संस्थेच्या वतीने सभासदांना देण्यात येणार असल्याचे चेअरमन निलेश लामखडे, व्हाइस चेअरमन खंडु खुटाळ, सचिव कैलास लामखडे यांनी या वेळी सांगितले.
या प्रसंगी गावातील माजी सैनिक, शासकीय सेवेत नोकरी मिळवणाऱ्या तरुण – तरुणींचा, खेळात तालुका जिल्हा पातळीवर प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा तसेच गावातील
उच्चपदावर नियुक्ती व निवृत्त अधिकारी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी युवा नेते अमित बेनके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार,
गावच्या माजी सरपंच तारा लामखडे,माजी पंचायत समिती सदस्य भानुदास खराडे, उद्योजक संभाजी चव्हाण, माजी उपसरपंच चंद्रकांत ढगे, ग्रामस्थ, सर्व संचालक मंडळ, सभासद ठेवीदार व कर्जदार उपस्थित होते.
