कट मारला म्हणून एसटी चालकाला बेदम मारहाण
1 min read
शिक्रापूर दि.५:- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे- नगर महामार्गावरून चाललेल्या एसटी चालकाला कट का मारला, असे म्हणून एसटी थांबवून बेदम मारहाण केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष बबन कतिच्छे व अश्विनी संतोष कतिच्छे (दोघे रा. तुळापूर ता. हवेली) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरेगाव भीमा येथे महामार्गावरून कोपरगाव एसटी डेपोचे चालक अनिल केदार व वाहक मंगेश माहाळे हे एस टी घेऊन पुणे बाजूने अहिल्यानगरच्या दिशेने चाललेले होते. कोरेगाव भीमाजवळील कल्याणी फाटा येथे आल्यानंतर दुचाकीहून आलेल्या एकजण व महिलेने एसटीसमोर दुचाकी आडवी लावून एसटीमध्ये प्रवेश करुन.
चालकाला शिवीगाळ दमदाटी करीत कट का मारला, असे म्हणून मारहाण करत जखमी केले. एस टी चालक अनिल केदार (सध्या रा. मोहिनीराज नगर, जि. नगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
