वळसे पाटील महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
1 min read
निमगाव सावा दि.५:- निमगाव सावा (ता.जुन्नर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक व इतिहास विभाग आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात कला शाखेचे समन्वयक प्रा. घोडे व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापूजनाने झाली.इतिहास विभाग प्रमुख प्रा.नीलम गायकवाड यांनी महात्मा गांधीजींचे सामाजिक कार्य हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापुरते मर्यादित नव्हते
तर त्यांनी अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, गरिबी निर्मूलन, शिक्षण आणि सामाजिक न्यायावर विशेष भर दिला.तसेच त्यांनी गावातील लोकांना एकत्र करून खादी व इतर ग्राम उद्योगांना प्रोत्साहन दिले. ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.
त्या कार्यकाळात लाल बहादूर शास्त्री एक प्रभावी पंतप्रधान होते. त्यांची “जय जवान, जय किसान” ही घोषणा लोकप्रिय ठरली.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अजय नन्नवरे यांनी केले आणि आभार प्रा. ज्योती गायकवाड यांनी मानले.
