बोल्हेगावात कोयता घेऊन दहशत करणारा आरोपी जेरबंद

1 min read

अहिल्यानगर दि.५:- येथील बोल्हेगाव परिसरात गुन्हेगारी डोके वर काढत असून पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आहेत. बोल्हेगावात हातात कोयता घेऊन दहशत करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एका कोयता हस्तगत करण्यात आला आहे. रवी ज्ञानेश्वर साळुंके (वय २९, रा. शिंदे कॉलनी, बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार रवी सांळुके हा व्यक्ती बोल्हेगाव फाटा परिसरात हातात धारदार कोयता घेऊन दहशत करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक फौजदार राकेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप पवार, राजू सुद्रिक, देविदास खेडकर, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, उमेश शेरकर यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!