….मग आमच्याशी हिंदूत्वाबद्दल बोला; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
1 min read
मुंबई दि.३:- शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईमध्ये भर पावसात पार पडला. या मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दसरा मेळाव्यामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट सवाल करत जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली आहे.भाजपकडून अनेकदा ठाकरे गटाने हिंदूत्व सोडलं असा आरोप केला जातो. याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले आहे. तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्याशी हिंदूत्वाबद्दल बोला. असा उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे.
आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं की, लढेल तो तुरुंगात जाईल अशी सरकारची वृत्ती आहे. कमळाबाईने चिखल करुन ठेवला आहे. 3 वर्षे झालं मणिपूर जळत आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता तिकडे गेले आहेत. तिथल्या महिलांची धिंड निघत आहे.
तरीही मोदी गेले नाहीत. आता ते गेले त्यावेळी वाटलं की ते पीडितांना भेटतील. मात्र त्यांना मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातील पाणी नाही दिसलं. भाजप म्हणजे आता अमिबा झाला आहे, पाहिजे त्यासोबत युती करतात आणी हातपाय पसरत आहे. इंडिया टुडेने सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असा सर्वे केला.
आमची सत्ता mmअसताना मुख्यमंत्री पहिल्या पाचात होता. मीमात्र आताचे मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत. शिवसेना प्रमुखांनी सांगितले आहे की धर्म कुणाचा कोणताही असू शकतो, मात्र आम्ही हिंदू आहोत, कुणी मुस्लिम आहेत, कोणी ख्रिश्चन आहेत.धर्म कुणाला कोणताही असला तरी राष्ट्र धर्म हा एकच असला पाहिजे,
तो म्हणजे हिंदुस्थान. धर्म हा घरामध्ये ठेवा, बाहेर पडलं की आमचा देश हा आमचा धर्म ही आमची शिकवण आहे, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.जेवढी होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करा. माझं कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती. मात्र आता भाजप अजून कर्जमाफी करतच आहे.
२०१७ मध्ये ला फडवणीस यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वसन दिलं होतं. मात्र अजून त्यांनी त्यांची घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना निकष बाजुला ठेवून शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजारांची मदत करा. तेथील संकट खूप मोठं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या फोडाफाडीच्या राजकारणावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जबरदस्त हल्लाबोल केला. कमळाबाईनं आपली कमळं फूलवून घेतली.भाजपनं सर्वत्र चिखल केलाय. अनेक पक्षाचे लक्ष आपला पक्ष फोडण्याकडे लक्ष आहे. पण जे गेले ते पितळ होते. पण जे राहिले आहे ते माझ्याकडील खरं सोनं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.