पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
1 min read
मुंबई दि.३:- मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी त्यांना मदत मिळेल, हा एकनाथ शिंदे याचा शब्द आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. यंदाच्या पुरग्रस्तांच्या संकटामुळे हा मेळावा मुंबई आणि ठाण्यापुरताच आयोजित केला होता. आज बाळासाहेब असते त्यांनी आम्हाला आशीवार्द दिला असता असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.एकनाथ शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमी थाटामाटात साजरा होत असतो,
यंदा बळी राजा संकटात असल्याने आणि मराठवाड्यात आपत्ती आली आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी मीच शिवसैनिकांना सांगितले की तुम्ही तेथेच थांबा पूरग्रस्तांना मदत करायला. तसेच मुंबई आणि ठाण्यापुरता हा दसरा मेळावा मर्यादीत केला असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बळीराज्याच्या डोळ्यात अश्रू आहे. शेतीवाहून गेली आहे. घरे पडली आहेत. त्यांचे दु:ख डोळ्याने मी स्वत: पाहीले आहे. कारण बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले की ८० समाजकारण आणि २० टक्के राजकारण करायचे. हा मंत्र आपण सोडला नाही. जेथे संकट तेथे शिवसेना,जिथे संकट तेथे हा एकनाथ शिंदे धावून जातो असेही शिंदे यावेळी म्हणाले.
मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे. महापुराने बळीराजा कोलमडला आहे. अटी आणि शर्थी बाजूला ठेवून बळीराजाला मदतीचा आधार दिला पाहीजे. संकट मोठे आहे. अनेक वर्षात एवढा पाऊस आम्ही पाहिला नाही असे शेतकरी म्हणत आहेत. सगळं काही उद्धवस्त झाले आहे.
म्हणून या मेळाव्याला आपण आजूबाजूच्या लोकांना बोलवले. दसरा सण मोठा, नाहीआनंदाला तोटा. परंतू यावेळी पुराचे संकट आहे. आपण त्यासाठी हा निर्णय बळीराजासाठी घेतला आज बाळासाहेब असते तर आपली पाठ थोपटली असती.आता मदतीचा हात द्यायचा नाही तर कधी द्यायचा..
पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ आला,पूर आला तेव्हा शेतकऱ्यांना अन्नधान्य पाणी,चारा देण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका,टोकाचे पाऊल टाकू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांची वेदना आहे.
पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तुम्हाला मदत दिवाळी येण्यापूर्वी दिली जाईल हा तुमच्या एकनाथचा शब्द आहे. इरसाल वाडी असो की कश्मीरमध्ये पहलगाम झाले तेव्हा आपण त्यांना सुखरुपण आणण्याचे काम केले. बाळासाहेब म्हणायचे की संकटात शिवसैनिक घरात दिसता कामा नये. लोकांच्या दारात दिसला पाहिजे असेही शिंदे यावेळी म्हणाले.