आळेफाटा येथे गणेश दूध संस्थेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र सुरू

1 min read

आळेफाटा दि.२:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथे गुरुवार दि 02 रोजी विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित राजुरी संस्थेचे राजुरी दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र एस टी स्टँड येथे सुरू झाले आहे.

या उद्घाटनाचा कार्यक्रम ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे यांचे शुभ हस्ते तसेच ग्राम नेते दिपक आवटे (मा.सभापती पं. स. जुन्नर) यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडला. येथे दूध, दही, लस्सी, ताक, श्रीखंड, पनीर, कुल्फी, तूप, पेढे आदी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

या वेळी उपस्थितित राजुरी गावचे सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, नेताजी डोके, माऊली कुऱ्हाडे, वल्लभ शेळके, संस्था चेअरमन सुभाष पा. औटी, व्हा. चेअरमन दिलीप घंगाळे, मा. चेअरमन बाळासाहेब हाडवळे, मा. व्हा. चेअरमन एल.डी घंगाळे, एम.डी.घंगाळे, व सर्व आजी माजी संचालक मंडळ, आळे दूध संस्था चेअरमन उल्हास सहाणे,

जी. के. औटी, जयसिंग औटी,चंद्रकांत जाधव, एकनाथ शिंदे, अशोक औटी, गोपाळा औटी, मोहन नायकवाडी, अशोक हाडवळे, किरण औटी, तसेच राजुरी, आळे, वडगाव आनंद या गावचे विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ, गणेश दूध संस्था सभासद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!