विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पराग ऍग्रो साखर कारखान्याचा ९ वा बॉयलर अग्नीप्रदिपन व गव्हाणपूजन सोहळा
1 min read
शिरूर दि.२:- शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक ठरलेल्या पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. साखर कारखान्याचा सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मंगलदिनी होत आहे. यानिमित्ताने कारखान्याचा ९ वा “बॉयलर अग्नीप्रदिपन व गव्हाणपूजन समारंभ” गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.साखर हंगामाचा प्रारंभ हा नेहमीच उत्साहाचा क्षण असतो. शेतकरी बांधवांनी वर्षभर मेहनतीने पिकवलेल्या ऊसाला कारखान्यात गोडीची सुरुवात मिळते. या निमित्ताने कारखान्याच्या प्रांगणात गव्हाणपूजन करून.
पारंपरिक पद्धतीने बॉयलर अग्नीप्रदिपन करून गळीत हंगामाची औपचारिक सुरुवात होईल. कारखान्याच्या परिसरात विशेष सजावट करण्यात आली असून शेतकरी व उपस्थित मान्यवरांचे पारंपरिक स्वागत केले जाणार आहे. पराग अॅग्रो साखर कारखाना गेल्या आठ हंगामांपासून शेतकरी बांधवांच्या सहकार्याने आणि मेहनतीने यशस्वीपणे कार्यरत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे, परस्पर विश्वास व परस्पर सहकार्य या तीन गोष्टींवर कारखान्याने नेहमीच भर दिला आहे. साखरेसोबतच पॉवर प्रकल्प व डिस्टिलरी विभागामुळे कारखाना शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे.