खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याने अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश

1 min read

शिरूर दि.२:- टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता याबाबत स्थानिक नागरीक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष चौकशी समिती नेमली होती. परंतु या चौकशी समितीतील आधिकाऱ्यांनी वस्तूनिष्ठ अहवाल तयार न करता फक्त मर्जीतील नागरीकांकडून म्हणणे घेऊन अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे दिला होता. ही बाब नितीन पिंगळे व नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी तो अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळवला यातील गंभीर बाब म्हणजे यातील चौकशी समितीतील प्रमुख असणारे उपजिल्हा आरोग्य अधिकारी सचिन एडके यांची या अहवालावर सहीच नाही.याबाबत खासदार अमोल कोल्हे यांना हा चुकीचा प्रकार निदर्शनात आणून दिला.खासदार अमोल कोल्हे यांनी ताबडतोब जिल्हा आरोग्य अधिकारी हंकारे यांना दूरध्वनी द्वारे फोन करून पुन्हा या प्रकरणाची फेर चौकशी करण्याचे आदेश दिले.जर या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास येत्या चार दिवसात मी त्या आरोग्य केंद्राला टाळे ठोकेल असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी हंकारे यांना दिला होता. हंकारे यांनी दि.१ ऑक्टोबर रोजी फेर चौकशीसाठी समिती पाठवली होती परंतु या समितीत पुन्हा तेच अधिकारी नेमण्यात आले. त्यामुळे नितीन पिंगळे व नागरिकांनी हे चुकीचे अधिकारी या ठिकाणी पाठवू नका अशी मागणी केली त्यानुसार हंकारे यांनी आता नवीन चौकशी नेमले असून येत्या ३ तारखेला ही चौकशी समिती चौकशी करण्यासाठी येणार आहे.दरम्यान प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी राजेश कट्टीमनी यांनी नितीन पिंगळे व नागरिकांना असे सांगितले. की मला वरिष्ठांच्या दबावामुळे हा खोटा अहवाल तयार करावा लागला असे कबुल केले आहे. कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर दबाव होता हे मात्र त्यांनी सांगितले नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्याचे वडील ‘कलेक्टर’असल्यामुळेच या अधिकाऱ्यांवर दबाव येत असणार हे मात्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे या सर्व चौकशी समितीतील अधिकाऱ्यांची कॉल डिटेल्स, मॅसेज, व्हॉटसअप यांची तपासणी होणे गरजेचे आहे.आता खोटा अहवाल बनवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ काय कार्यवाही करणार? किंवा येणारी चौकशी कमिटी दबावाखाली पारदर्शकपणे चौकशी करून योग्य अहवाल पाठवणार का?हे आता येणारा काळच ठरवणार आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील,आमदार रोहित पवार,जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे ,खाजदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील यांनीही पत्रव्यवहार केला असून त्यांच्या पत्रालाही केराची टोपली आरोग्य प्रशासनाकडून दाखवण्यात येत आहे.निवासी न राहणाऱ्या व कर्तव्य कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली व कारवाई न झाल्यास तसेच खोटा चौकशी अहवाल तयार करणाऱ्या राजेश कट्टीमनी व माधवी शिंदे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता नऊ गावातील ग्रामस्थ उपोषणास बसणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!