पूरग्रस्तांना दिवाळीआधी मदत, KYC ची अट शिथील:- मुख्यमंत्री फडणवीस
1 min read
मुंबई दि.१:- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना मदत करणे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पूरग्रस्तांना दिवाळीआधी मदत देण्याचा, तसेच ई-केवायसी करण्याची अट शिथील करण्याबाबत निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय विभागांतर्गत वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना सर्व सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण नियमांमध्ये ‘ओला दुष्काळ’ असं काहीच नाहीये.
आजवर कधीही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. तथापि आम्ही निर्णय घेतला आहे की दुष्काळ पडतो तेव्हा ज्या उपाययोजना राबवल्या जातात, तेव्हा ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती यावेळी देखील दिल्या जातील, सर्व प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जातील.”
