सह्याद्री व्हॅलीत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता इंडक्शन प्रोग्राम
1 min read
राजुरी दि.१:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता, प्रेरण कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी (डिप्लोमा) कॉलेज चे खजिनदार सचिन चव्हाण,
उपप्राचार्य बालारामूडू पेरुमल्ला व डिप्लोमा कोऑर्डिनेटर मिनाज पटेल, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. डेंगळे प्रविण यांच्या हस्ते करणात आले.

उपप्राचार्य बालारामूडू पेरुमल्ला यांनी महाविद्यालयाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विश्लेषण केले व प्रेरण कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगितला.
विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता उपयुक्त वातावरण निर्माण करणे,त्यांच्या शैक्षणिक आवडी आणि उपक्रमांना प्रोत्साहन देणे, शिक्षकांमध्ये नातेसंबंध निर्माण करणे, एक निरोगी दैनंदिनी तसेच, एकमेकात प्रेम संघभावना, आत्मविश्वासाची भावना, संवेदनशीलता आणि स्वतः ची समज विकसित करून स्वयंम प्रेरणा तयार करणे
व सार्वत्रिक मानवी मूल्ये वाढी करता मार्गदशन हा कार्यक्रमाचा उद्देश होता.प्रेरण कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) चे प्रमुख पाहुणे, सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी (डिप्लोमा) कॉलेज चे खजिनदार सचिन चव्हाण, उपप्राचार्य बालारामूडू पेरुमल्ला यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने उदिष्ठ साध्य करणेकरिता मेहनत करण्याकरिता प्रेरित केले.
अभ्यासात सातत्य ठेवून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे व एक चांगले व्यक्तीमत्व म्हणून नवनवीन उपक्रम हाती घेऊन राष्ट्र बांधणीच्या कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी कल्चर आणि ट्रॅडीशन बद्दल विद्यार्थ्यांना संबोधले आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डिप्लोमा विभागाद्वारे करण्यात आले होते.प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करून आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
