सह्याद्री व्हॅलीत तांत्रिक ज्ञान आणि भविष्यातील उद्योगातील संधीचे धडे

1 min read

राजुरी दि.१:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये एक विशेष अतिथी व्याख्यान (Guest Lecture) आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान आणि भविष्यातील उद्योगातील संधींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. हनुमंत राव बंडारी, सिनियर इंजिनिअर, जी एम आर टी, एन सी आर ए टी आय एफ आर, खोडद यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या व्हेरियस टाइप्स ऑफ औंटेना अँड देयर एप्लीकेशन (“Various Types of Antenna With Respect To Their Application”) या विषयावरील सखोल ज्ञानाने आणि अनुभवाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना टिनाची माहिती आणि अँटिनाचे विविध प्रकार यांची माहिती मिळाली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे खजिनदार सचिन चव्हाण, उपप्राचार्य बालारामूडू पेरुमल्ला व डिप्लोमा कोऑर्डिनेटर मिनाज पटेल सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील तज्ञांकडून थेट अनुभव शिकण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी व्याख्यान खूपच उत्साहाने ऐकले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून महाविद्यालयाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना व्यावहारिक जगाची ओळख करून देणे हा आहे. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आणि त्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीस योग्य दिशा मिळाली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग (डिप्लोमा) विभागाद्वारे करण्यात आले होते.प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त करून आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!