विद्यार्थांना स्टडी बडी ॲप्लिकेशनचे विनामूल्य वाटप

1 min read

बेल्हे दि.१:- पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीचे औचित्य साधून, बेल्हे येथील श्री बेल्हेश्वर विद्यालय, भाग शाळा साकोरी व न्यू इंग्लिश स्कूल कळस (ता.पारनेर) येथील दहावीच्या २४१ विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी (पुणे) व श्री बेल्हेश्वर माजी विद्यार्थी प्रतिष्ठान यांच्या बेल्हे, योगदानातून स्टडी बडी
ॲप्लिकेशनचे विनामूल्य वाटप करण्यात आले.पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या १३८ व्या जयंतीचे औचित्य साधून दहावीच्या मुलांना अभ्यास करण्यास सोयीस्कर असे अभ्यास मोबाईल ॲप्लिकेशनचे वाटप करण्यात आले. यासाठी जवळपास ३,६१,५०० रुपयांचा निधी रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी (पुणे) आणि श्री बेल्हेश्वर माजी विद्यार्थी प्रतिष्ठानचे सदस्य अण्णासाहेब मटाले यांच्याकडून उपलब्ध करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरियन डॉ.संतोष मोरे, माजी अध्यक्ष दिपक सोनवणे, प्रायोजक अण्णासाहेब मटाले, विजय गोरडे, सुनील पाटे, पंकज महाले, बाळासाहेब कोते, बबनराव वाडेकर, दादासाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मगर हे रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच श्रीबेल्हेश्वर माजी विद्यार्थी प्रतिष्ठानचे सदस्य अशोक घोडके, सुधाकर सैद, रामदास गुंजाळ, बबन गुंजाळ, योगेश शहा, विजय गाडेकर, शांताराम भालेराव, सुरेश पिंगट हे उपस्थित होते. तसेच शालेय शिक्षण समिती व मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत २४१ विद्यार्थ्यांना स्टडी बडी ॲप्लिकेशनचे विनामुल्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर संतोष मोरे यांनी रोटरी ही समाजात आरोग्य व शिक्षणाच्या गरजा पूर्ण करते, हे सांगून सामाजिक काम करताना विविध शाळांमध्ये स्टडी ॲप्लिकेशनचे विनामूल्य वाटप करण्यात आले आहे.याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व समाजातील गरीब, गरजू, होतकरू व आदिवासी विद्यार्थी यांना होत असून ॲपकेशनचे विद्यार्थी आपल्या यश प्राप्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचतात.असे मनोगतातून सांगितले.यापुढेही असेच काम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याचे सांगून, त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!