मांजरवाडी येथे बिबट जेरबंद जेरबंद
1 min read
ओझर दि.३०:- सोमवार दि २९ रोजी सकाळी मांजरवाडी येथील खंडागळे मळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांच्या घरासमोरील लावलेल्या पिंजऱ्यात एक अंदाजे दोन ते तीन वर्षाची बिबट मादी पहाटे अंदाजे ६ वाजता जेरबंद झाली.
या जेरबंद झालेल्या मादीच्या बाजूला दोन बिबट्यांची तिला सोडण्यासाठी प्रयत्न चालू होते..सदर घटनेची माहिती माऊली खंडागळे यांच्या पत्नी यांनी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना दिली जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे,जुन्नर वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ,
मांजरवाडीचे पोलीस पाटील सचिन टावरे यांनी ग्रामपंचायत सदस्य उदय खंडागळे,संजय खंडागळे,स्वप्निल खंडागळे, सुकदेव खंडागळे,मांजरवाडी चे उपसरपंच संतोष मोरे,रेस्क्यू टीम सदस्य राम चोपडा,तुषार टेके,सुखदेव खंडागळे, विलास नाना खंडागळे, पपू खंडागळे यांच्यासह घटनास्थळी जाऊन बिबट मादी कैद केलेला पिंजरा गाडीमध्ये टाकण्यास मदत केली.
सदर बिबट मादीस माणिक डोह बिबट निवारण केंद्र या ठिकाणी नेण्यात आले असल्याचे जुन्नर वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.
