काळुबाईच्या दर्शनाला मांढरदेवला भक्तांचा महापूर

1 min read

मांढरदेव, दि.३०:-महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई कळुबाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सात दिवसांपासून सुरू आहे.घटस्थापनेपासून ते सहाव्या माळेपर्यंत हजारो भाविक देवीच्या दर्शनाला रोज येत होते. मांढरदेव येथील वातावरणामध्ये दोन दिवसांपासून प्रचंड बदल झालेला असून गर्द दाट धुके, कडाक्याची थंडी आणि पावसाची संततधार असताना सुद्धा नवरात्र उत्सवातील सातव्या माळेला रविवारी भाविकांनी देवीच्या दर्शनाला प्रचंड अशी गर्दी केली.अंदाजे दोन लाखांहून जास्त भाविकांनी देवीच्या दर्शनाला गर्दी केली होती. गडावर भक्तांचा महापूर आल्यासारखे वाटत होते.सतत येणाऱ्या पावसामुळे व दाट धुक्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे आणि त्यातच गडावर झालेली भक्तांची गर्दी यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मांढरदेवीला येणारे वाई व भोर दोन्ही घाट मार्गामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी झाली होती. परंतु, प्रचंड गर्दी असताना सुद्धा रस्त्याने शिस्तीमध्ये प्रवास करून भाविक देवीचे दर्शन घेऊन सुखरूप परतताना दिसत होते.देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहावयास मिळत होते.आणि त्यामुळे त्यांना जो थंडीचा,पावसाचा गर्दीचा त्रास झाला होता तो ते पूर्णपणे विसरून गेल्याचे भासत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!