साकोरीचे कवी अशोक उघडे यांना नक्षत्र गौरव पुरस्कार प्रदान
1 min read
साकोरी दि.३०:- साकोरी येथील कवी अशोक उघडे यांना नक्षत्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नक्षत्राच देण काव्य मंच या पुण्यातील संस्थेकडून संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त कवी साहित्यिक व उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या रौप्य महोत्सवात साकोरी तर्फे बेल्हे जुन्नर येथील कवी अशोक उघडे यांना नक्षत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील सायन्स पार्क नाट्यगृहात दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.
महोत्सवात राज्यभरातून कवि साहित्यिक आणि उद्योजक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील प्रसिद्ध कवी व लेखक रामचंद्र पंडित हे होते.
यावेळी नक्षत्राच देणे काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, श्रीकांत चौगुले, डॉक्टर अलका नाईक, सुलभा चव्हाण, अंजू सोनवणे, योगेश बाहेती, आदी मान्यवर उपस्थित होते.
