वळसे पाटील महाविद्यालयात शहीद भगतसिंग यांना श्रद्धांजली अर्पण
1 min read
निमगाव सावा दि.३०:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सलग्नित, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत शहीद भगतसिंग जयंती व जागतिक हृदय दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शहीद भगतसिंग यांच्या कार्याबाबत युवकांमध्ये देशभक्ती ,साहस आणि सामाजिक जबाबदारी निर्माण व्हावी.
तसेच त्यांच्या आदर्शाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर जागतिक हृदय दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे हृदयविकार आणि स्ट्रोक मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा असल्याचे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका स्नेहल जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये शहीद भगतसिंग यांची देशभक्ती आणि कार्याची माहिती दिली.त्याचबरोबर भारत स्वातंत्र्य व्हावा ही मुख्य प्रेरणा आणि जिद्द भगतसिंग यांची होती असे त्यांनी मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये हृदय म्हणजे आपल्या जीवनाचा ध्रुवतारा आहे.त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. जागतिक हृदय दिन आपल्याला आठवण करून देतो की जग जिंकण्यापूर्वी स्वतःचे हृदय जिंकणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
त्याचबरोबर भगतसिंग यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार यांनी जागतिक हृदय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व शहीद भगतसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश भालेराव यांनी केले तर आभार प्रा.कीर्ती टाव्हरे यांनी मानले.
