भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा

1 min read

मुंबई दि.३०:- राज्यात पुन्हा सत्तेत येऊनही मंत्रि‍पदी वर्णी न लागलेल्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा अखेर सुगीचा काळ आलेला आहे. दरेकर यांची वर्णी महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. या अध्यक्षपदाला मंत्रि‍पदाचा दर्जा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांना मंत्रि‍पदाचा दर्जा देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.प्रवीण दरेकर, यांच्या अध्यक्षतेखाली २४ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याकरीता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सवलती देण्याबाबत १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील विविध मुद्यांची पुर्तता/अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची शासनास शिफारशी करण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला होता.सदर अभ्यासगटाने १४ जुलै २०२५ रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे अहवाल सादर केला आहे. सदर अभ्यासगटाने सादर केलेल्या शिफारशींची प्रभावी अंलबजावणी होण्याकरीता स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्यास मुख्यमंत्रीफडणवीस यांची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच, सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रविण दरेकर, यांना नियुक्त करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यास विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महोदय यांनी मान्यता दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!