पूरग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिराकडून १० कोटीची मदत
1 min read
मुंबई दि.३०:- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शेती वाहून गेली आहे. शेतातली पिकं अक्षरश: कुजली आहेत. अनेक संसार उद्ध्वस्त झाली आहेत. लहान मुलांची वह्या, पुस्तकं सर्व वाहून गेले आहेत.
अनेक स्वप्न महापुराने वाहून नेले आहेत.त्यामुळे पूरग्रस्तांना आता मदतीची नितांत गरज आहे. आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पूरग्रस्तांना १० कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही मदत सुपूर्द करण्यात आली आहे, मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पूरग्रस्त नागरिकांना पुन्हा उभं करणं ही नागरीक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परिने प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या मंदिर ट्रस्टकडून कोट्यवधी रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली जात आहे. काल पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडून मंदिर जाहीर झाली.
तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडूनही मदत जाहीर झाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्र्स्टकडून मदत जाहीर झाली.यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरर ट्रस्टकडून मदत जाहीर झाली आहे. महाराष्ट्राचं संकट मोठं आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
संपूर्ण महाराष्ट्र पुराच्या संकटातून झुंजत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार पूर्ण प्रयत्नदेखील करत आहे. भगवान श्री सिद्धिविनायकांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. महाराष्ट्र या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावा.
यासाठी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट बोर्डाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
