जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलची धडाकेबाज कामगिरी!
1 min read
पुणे दि.३०:- उत्कट मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथील विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत चमकदार यश मिळवत शाळेचा गौरव उंचावला.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे ग्रामीण यांच्या मार्फत युनिक स्पोर्ट्स क्लब, शिरूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन केले.
सुवर्ण व कांस्य जिंकणाऱ्या विद्यार्थिनी :
आराध्या गणेश हाडवळे – 400 पैकी तब्बल 298 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. रितिका रोहिदास शेळके – अवघड स्पर्धेत उत्तम नेम साधत कांस्यपदकावर नाव कोरले. या दोन्ही विद्यार्थिनींची विभागीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली असून शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक यशस्वी पर्व नोंदले गेले आहे.
इतर सहभाग घेतलेले खेळाडू : ज्ञानेश्वरी प्रवीण पठाडे, स्तुती अजित कुचिक, वेदिका विलास अभंग, श्रवण प्रशांत कळमकर, आराध्य गजानन गुंजाळ, अर्णव दत्तात्रय भोर.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाचे खरे सोने झाले. त्यांना नेहमी प्रोत्साहन व योग्य प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक शिक्षक किशोर काकडे यांच्या अथक प्रयत्नांचे सर्वांनी विशेष कौतुक केले.
मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सुवर्ण व कांस्यपदक विजेत्या विद्यार्थिनींसह सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शाळेच्या यशस्वी कामगिरीत विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
