बेल्हे- साकोरी रस्त्यावरील पुलावरून प्रवास करणे धोकादायक

1 min read

बेल्हे दि.२९:- बेल्हे- साकोरी रस्त्यावरती कुकडी कॅनल वर असणाऱ्या पुलाच्या खालच्या दोन्ही बाजूचा जवळ जवळ अर्धाफुट स्लॅब पडला असून पुलाचे स्टील उखडले आहे. वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक झाला असून दुरुस्तीची मागणी माजी सरपंच पांडुरंग साळवे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती असे की बेल्हे – साकोरी गावला जोडणारा महत्वाचा कुकडी कॅनॉलचा पूल असून पुलाला खालच्या दोन्ही बाजूने तडे गेले आहेत. या पुलाचा अंदाजे अर्धा फूट स्लॅब तुटून खाली पडला आहे. स्लॅबचे स्टील उखडले असून हा फुल वाहतुकीसाठी धोकादायक निर्माण झाला आहे.

वरच्या बाजूने नवीन डांबरी रस्ता असल्याने हा पूल चांगला दिसतो परंतु खालच्या बाजूने कालव्याच्या पाण्याचे हा पूल जीर्ण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची पाहणी करून पूल दुरुस्त करावा किंवा नवीन पूल उभा करावा अशी मागणी साकोरी गावचे माजी सरपंच पांडुरंग साळवे यांनी केली आहे. या पुलावरून होणारी अवजड वाहतूक थांबवावी असेही मागणी साळवे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!