इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन च्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त भव्य रॅली

1 min read

नारायणगाव दि.२९:- इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा शाखा, जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव सहानी तसेच जुन्नर आंबेगाव खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, विशाल सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चोरडिया, माजी अध्यक्ष सुरेश वन्हाडी व अजय चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. डी. गायकवाड यांच्यासह समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, जयहिंद कॉलेज फार्मसी ,कुरण ,मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, शिवनेरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त विविध महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी नारायणगाव शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली ‘थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट’ या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट दिनानिमित्त शपथ देण्यात आली. यावेळी बोलताना उपसरपंच बाबू पाटे यांनी फार्मासिस्ट ला देवदूत म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. सीनियर फार्मसिस्ट सुरेश वन्हाडी यांनी मेडिकल व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी नारायणगाव वारूळवाडी परिसरातील कार्यरत फार्मासिस्टचा कोरोना काळात केलेल्या कार्याचा एकभाग म्हणून विशेष प्रतिन्यापत्र देऊन गौरव करण्यात आला.महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जुन्नर आंबेगाव खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोपार देण्यात आला तसेच सहभागी महाविद्यालयाना बीपी उपकरणे देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!