अंबाबाईला,तिरुपती तिरुमला देवस्थानाकडून १ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मानाचा शालू अर्पण
1 min read
कोल्हापूर दि.३०:- शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमीच्या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीला परंपरेप्रमाणे तिरुपती तिरुमला देवस्थानाकडून मानाचा शालू अर्पण करण्यात आला.यंदाचा हा शालू गुलाबी काठ असलेला पिस्ता रंगाचा असून तब्बल 1 लाख 66 हजार रुपये किंमतीचा आहे.
देवीसाठी या शालूचे सुपूर्त करताना खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि तिरुमला देवस्थानचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.तिरुपती तिरुमला देवस्थानाचे पदाधिकाऱ्यांनी दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमाला महत्त्व दिले आहे.
सोमवारी परंपरेप्रमाणे तिरुपती येथील व्ही प्रभाकर रेड्डी, आमदार व्ही प्रशांती रेड्डी आणि भानूप्रकाश रेड्डी यांसह तिरुपती तिरुमला देवस्थानकडून देवीसाठी शालू आणण्यात आला होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे हा शालू सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर तिचे विधिवत पूजन अंबाबाई मंदिरात करण्यात आले.
