दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात आरोग्य तपासणी
1 min read
निमगाव सावा दि.२७:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत शुक्रवार दि. 26 रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांच्या शुभहस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महाविद्यालयातील 55 विद्यार्थिनींची एच.बी., कॅल्शियम, शुगर यासारख्या तपासण्या करण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा येथील श्री मधुकर म्हारसे,शितल दरंदळे लॅब टेक्निशियन,विराज शेजुल आरोग्य सेवक, ऋतुजा गाडगे यांच्या आरोग्य तपासणी पथकाने महाविद्यालयीन मुलींच्या तपासण्या केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा मधील शीतल दरंदळे यांनी विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनामध्ये उद्भवणाऱ्या
आरोग्य समस्या व त्याबाबत असणाऱ्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.त्यानंतर महाविद्यालयांमध्ये जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा ज्योती गायकवाड तसेच रणदिवे श्रीविद्या यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापक येथे कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा उत्तरा काटे प्रास्ताविक प्रा योगेश भालेराव आणि राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी प्रवीण गोरडे यांनी आभार मानले.
