दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात डॉ. मनमोहन सिंग जयंती उत्साहात साजरी
1 min read
निमगाव सावा दि.२७:-दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांनी डॉ. सिंग यांच्या प्रगल्भ नेतृत्वगुणांवर, आर्थिक धोरणांवर आणि भारताच्या आर्थिक प्रगतीतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.
या वेळी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अनिल पडवळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मनमोहन सिंग यांच्या बालपणापासून तर पंतप्रधान पदापर्यंतची वाटचाल सांगितली.या कार्यक्रप्रसंगी वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. ज्योती गायकवाड, विज्ञान शाखा समन्वयक प्रा. प्रवीण गोरडे,
इतिहास विभाग प्रमुख प्रा.नीलम गायकवाड व महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात कु.कल्याणी पानमंद, प्रियांका भोर, त्रिवेणी लामखडे, साईनाथ कोयमहाले या विद्यार्थ्यांनी डॉ. सिंग यांच्या जीवनावर आधारित भाषणे आणि माहिती सादरीकरणे केली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता आणि नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तरा काटे, प्रास्ताविक प्रा. योगेश भालेराव तर आभारप्रदर्शन प्रा.नीलम गायकवाड यांनी केले.
