माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून शिरोलीला ४ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी

शिरोली तर्फे आळे (ता.जुन्नर) गावामधे २ कोटी ६५ लक्ष कामांचा लोकार्पण सोहळा व १ कोटी ९१ लक्ष रुपये कामांचा भूमीपूजन सोहळा माजी आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला च्या अध्यक्षस्थानी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार होते. गावाला एकूण ४ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी दिल्याने गावच्या सरपंच प्रिया खिल्लारी, उपसरपंच सुरेश सातपुते व ग्रामस्थांनी माजी आमदार बेनके यांचे आभार मानले.या वेळी गावातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, राम मंदिर सभा मंडप, ग्रामा ३४९ कॉलनी ते चिमटा ओढा रस्ता, खरचड जुना जुन्नर रस्ता, रांजणी मार्ग रस्ता, गवळी बाबा रस्ता, ग्रामा ३४९ चारंगबाबा चौक ते १५ बिगा रस्ता, दफनभूमी कंपाऊंड अशा एकूण २ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत, ग्रामा ३४९ चिमटा ओढा ते चारंग बाबा चौक रस्ता, डावखर मळा ते ठाकर वस्ती रस्ता, डावखर मळा रस्ता, गवाळी रस्ता, राम मंदिर सभा मंडप, घाटवस्ती साकव पूल, अशा एकूण १ कोटी ८१ लक्ष रुपयांच्या कामाचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गिलबिले यांनी केले. त्यानंतर प्रस्ताविक शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रिया खिल्लारी यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!