नारायणगावात जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा

1 min read

नारायणगाव दि.२७:- जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव सहानी तसेच इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा शाखा आणि जुन्नर आंबेगाव खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, विशाल सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चोरडिया, माजी अध्यक्ष सुरेश वऱ्हाडी व अजय चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. डी. गायकवाड यांच्यासह इतर महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव सहानी सह परिसरातील विविध महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी नारायणगाव शहरात भव्य रॅली काढून थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट दिनानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली.यावेळी बोलताना बाबू पाटे यांनी फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून समाजाला निरोगी ठेवण्यासाठी ते आपले मोलाचे योगदान देत असतात त्यामुळेच फार्मासिस्ट ला देवदूत म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे महत्त्वपूर्ण उद्गार उपसरपंच बापू पाटे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फक्त मेडिकल व्यवसायावर अवलंबून न राहता नोकरीच्या नवनवीन संधी तसेच स्वतःचा औषध निर्मितीचा कारखाना उभारता येईल का? अशी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण कशी करता येतील यासाठी प्रयत्न करावे असे मत जयहिंद संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी व्यक्त केले.सीनियर फार्मसिस्ट सुरेश वऱ्हाडी यांनी मेडिकल व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे नारायणगाव वारूळवाडी परिसरातील कार्यरत फार्मासिस्टचा कोरोना काळात केलेल्या कार्याचा एकभाग म्हणून विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जुन्नर आंबेगाव खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने अल्पोपार देण्यात आला या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!