श्री साईगणेश कृपाचे चेअरमन निलेश लामखडे यांची तज्ञ संचालक पदी निवड निवड
1 min read
मंगरूळ दि.२६:- मंगरूळ (ता.जुन्नर) श्री साईगणेश कृपा पंतसंस्था मंगरुळ संस्थेचे चेअरमन निलेश लामखडे यांची जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल माजी सरपंच तारा लामखडे, श्री साईगणेश कृपा पंतसंस्था मंगरुळ व्हाइस चेअरमन खंडू खुटाळ, सर्व संचालक,
व्यवस्थापक कैलास /विलास लामखडे, नवकिरण मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील वाजे, मुक्ताबाई महिला दुध संस्था मंगरुळ चेअरमन मिरा लामखडे, गुरुदेव दत प्रतिष्ठान कोरडेमळा अध्यक्ष बाबाजी कोरडे, यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
सहकार क्षेत्रातील योगदान हे समाज हिताच्या दृष्टीने उल्लेखनीय असल्याने जुन्नर तालुक्यातील सहकाराचा प्रसार व वाढ करण्याच्या दृष्टीने पतसंस्था फेडरेशनच्या तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती फेडरेशनच्या अध्यक्ष अमित बेनके व उपाध्यक्ष गुलाब नेहरकर यांनी दिली.

